#खानापूर पारिश्वाड रोडवरील बसस्थानका समोरच खड्डा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर नव्याने उभारलेल्या बसस्थानकाच्या समोरील खानापूर पारिश्वाड रोडवर दोन फुट खड्डा पडला आहे. याखड्डयाचा बसवाहन चालकाना तर त्रास होतच आहे. त्याचबरोबर खानापूर पारिश्वाड रोडवरून येजा करणार्या दुचाकी ,चारचाकी वाहन धारकाना याखड्ड्याचा वाहन चालविताना धोका पत्करावा लागत आहे.
बसस्थानका समोरच खड्डा!
खानापूर जांबोटी क्रासवरील बसस्थानकासमोर खानापूर पारीश्वाड रोडवर मोठा खड्डा पडला आहे.याकडे संबधीत बस डेपो मॅनेजरचे ,सबंधीत खात्याच्या अधिकार्याचे तसेच लोकप्रतिनिधीचे सर्वाचेच दुर्लक्ष झाले आहे.
हा खड्डा दिवसेदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे खड्डयाचा विस्तार वाढला आहे.हा खड्डा कुणाचा बळी घेणार हे सांगता येणार नाही.तेव्हा कुणाचा बळी जाण्याआदी खड्डा बुजवावा.
अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकाची ,प्रवाशाची मागणी होत आहे.