# पिकाचे नुकसान वनखाते सुस्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून परिचयाचा आहे. त्यामुळे तालुक्यात जंगली प्राण्याची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामळे जंगली गवेरेेडे भर दिवसा माडीगुंजी शिवारात संचार करताना माडीगुंजी येथील कन्या किर्ती बिरजे हिने फोटो टिपले.
अशा प्रकारे जंगली प्राणी मानवी वसाहती पर्यत येऊन माडीगुंजी परिसरातील पिकांचे नुकसान करत आहेत. शिवारात नुकताच भात नटीच्या कामाना जोर आला आहे.अशा शिवारात गवीरेडे शिरून भात पिकाचे नुकसान करतात. एवढेच नव्हे तर गवीरेडा धिप्पाड प्राणी पाऊले ही मोठी असतात . त्यामुळे भात शिवारात गवेरेडे फिरले तर पाण्याचे घळ पडून भात पिकातील पाणी नाहीसे होत आहे.त्यामुळे भात पिकाना पाण्याचा तुडवडा पडुन भात पिके सुकून जाण्याची भिती शेतकरी वर्गातुन पसरली आहे.
माडीगुंजी परिसरात गवीरेड्याचा दहा ते बारा कळप वेगवेगळ्या भागातील शिवारात फिरताना दिसत आहे.
तेव्हा माडीगुंजी परिसरातील वनखात्याच्या अधिकार्यानी गवीरेड्याचा बंदोबस्त करावा.अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
गवीरेड्याकडुन मनुष्याच्या जीवाला ही धोका!
भर दिवसा मोकाटपणे जंगलातील गवीरेडे शिवारात फिरताना शेतकर्याची गाठ पडली तर शेतकर्याच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे शेतकरी एकटे दुकटे शिवारात फिरणे धोक्याचे झाले आहे.