#सकाळच्या वेळेत वर्गखोली कोसळली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. मुसळधार पावसात घराच्या भिंती कोसळणे, शाळा कोसळणे हे प्रकार घडत आहेत.
असाच प्रकार बुधवारी दि .३० जुलै रोजी देमिनकोप ( ता. खानापूर) येथील सरकारी लोअर प्राथमिक शाळेची इमारत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोसळली.दैव बलवत्तर म्हणून जीवीत हानी झाली नाही .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की देमिनकोप येथे पाचवी पर्यत वर्ग चालतात. येथील शाळेतील एक वर्ग खोली गेल्या कित्येक वर्षापासुन वापरात येत नव्हती.त्यामुळे विद्यार्थी त्यावर्ग खोलीत बसत नव्हते. त्यामुळे जीवीतहानी टळली.
मात्र बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे शाळा भरली होती. प्रार्थना ही झाली होती.त्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जाऊन बसले. याचवेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोडकळीस आलेली वर्ग खोली कोसळली. सदैवाने विद्यार्थी इतर वर्गात होते.मधल्या सुट्टीच्यावेळेत वर्ग खोली कोसळली असता अनर्थ घडला असता.
शाळेची वर्ग खोली कोसळतीच शाळेचे मुख्याध्यापक श्री पुजारी यानी देमिनकोप शाळेचा एस डी एम सी कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटील ,उपाध्यक्ष मारूती पाटील गावातील शिक्षण प्रेमी नागरीक हणमंत पाटील ,सुरेश पाटील याना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
लागलीच सर्वानी शाळेकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच बीईओना याना फोनव्दारे माहिती दिली.
लागली सीआरपी अधिकारी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.