संदेश क्रांती न्यूज :


खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष या नात्याने अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यानी खानापूर तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना सुचना केली आहे.की,
खानापूर तालुक्यातील सर्व सरकारी रेशन दुकानात रेशन कार्ड ची ई केवायसी करावयास चालू आहे. त्या मोबदल्यात आपली म्हणजे रेशन कार्ड धारकाची फसवणूक होऊ नये त्यासाठी मी आपल्याला एक सुचना करत आहे व आव्हान करत आहे की ई के वाय सी च्या मोबदल्यात कोणत्याही दुकानदाराला एक पैसा ही देऊ नका कारण सरकारी रेशन दुकान असल्यामुळे ती ई के वाय सी मोफत आहे, तरी आपण कोणत्याही दुकानात पैसे देऊन ईवायसी करू नका किंवा आपण ई केवायसी केला नाही तर त्या दुकानदाराला तुम्हाला मिळत असलेला रेशनकोटा तो त्यांना मिळणार नाही, आणि त्यांना रेशनकोटा मिळाला तर त्यांना त्याचे कमिशन जाते त्यामुळे सर्व दुकानदारांनी मोफत ई-केवायसी केली पाहिजे जर का कोणी पैसे घेऊन ई केवायसी करत असेल आणि ते आमच्या निदर्शनात आले तर त्यांची रेशन दुकानदाराची लायसन रद्द करण्यात येईल,व कोणी पैसे देऊन जर का ईवायसी केलेले समजेल त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यास गॅरंटी योजनेच्या वतीने सरकारला शिफारस करण्यात येईल त्यासाठी आपण दक्ष राहावे व कोणीही ईकेवायसी साठी आपण एक रुपया सुद्धा देऊ नये याची काळजी आपण घ्यावी .व कोणताही दुकानदार गावात पैसे घेत असेल तर आपण या गावचा एक नागरिक व समाजसेवक आहे असे समजून आपण गॅरंटी योजनेच्या सदस्यांना किंवा अध्यक्षांना कळवावे .असे आवाहन करण्यात आले आहे.
