खानापूर प्रतिनिधि


संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना बंगळूर यांच्या माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कुल मणतुर्गा हायस्कुलचे शारिरीक शिक्षक किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.किरण पाटील हे चन्नेवाडी गावचे सुपुत्र असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे.अनेक तालुकास्तरीय तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये त्यांनी पंच व प्रशिक्षक म्हणून कार्य बजावलेले आहे,याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
ही निवड करताना खानापूर तालुकाच्या क्रिडा अधिकारी श्रीमती सुरेखा मिर्जी तसेच बेळगाव जिल्हा कार्यदर्शी एल. एन. कुरेर , प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष . सी आर. भोसले,बेळगाव जिल्हा सरकारी ग्रेड वन अध्यक्ष. बैलवाड , उमेश धबाले, एस. बी. अंबरगट्टी.एम.पी निचनकी ए. आर. पाटील ‘ सन्नार , पवार , सी.आर. तडकोड, सेवादल संचालक पत्तार आदी उपस्थित होते. यावेळी किरण पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार तसेच अभिनंदन करण्यात आले.तसेच मावळते अध्यक्ष सरकारी माध्यमीक शाळा हिरेमनोळीचे शारीरीक शिक्षक. बी. के. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील शारीरीक शिक्षक व सी. आर. पी. उपस्थीत होते.
