
संंदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराजवळील भोसगाळी कुटिन्होनगर शेजारी चौगुले पाटील अँग्रो इंडस्ट्रीजच्या नव्याने गुर्हाळ्याची सुरूवात रविवारी दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी,उदघाटक म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, गणेश फोटो पुजन नारायण चौगुले, नामफलकाचे अनावरण माजी आमदार दिगंबर पाटील,रमाकांत कोंडुस्कर अध्यक्ष श्रीराम सेना यांच्याहस्ते तर ऊस गाळप माजी आमदार अरविंद पाटील , मुरलीधर पाटील कार्याध्यक्ष म ए समिती.यांच्याहस्ते होणार आहे.
दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार असुन यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.