संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
रूमेवाडी ( ता. खानापूर ) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत केंद्र पातळीवरील शाळा सुधारणा व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मणतुर्गा एसडीएमसी अध्यक्ष ईश्वर बोबाटे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख पुष्पा सुतार यांनी केले.कार्यक्रम दरम्यान बोलताना आरपीडी कॉलेजच्या निवृत्त प्राचार्या शोभा नाईक यांनी भाषा हे समाज माध्यमाचे साधन आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. मराठी भाषा हे डोळे असून इंग्रजी भाषा हा चष्मा आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत त्यामुळे ग्रंथांचे वाचन करा असा सल्ला दिला. आर पी.श्रीमती एम बी संभाजी यांनी शाळा सुधारणा समितीची रचना ,कार्य ,सरकारी योजना त्याचबरोबर पोक्सो कायदा याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर एन एम करंबळकर, रितू हणमंत निलजकर , एस,डी पाटील , अध्यक्ष ईश्वर बोबाटे या प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. या एक दिवसाच्या प्रशिक्षणाला संदेश कोडेचवाडकर ,संपदा गोरल ,संजना गोरल ,अर्चना गुरव, महेश पाटील, लक्ष्मी करंजळकर ,सरिता पेडणेकर ,आनंदी कुरुमकर ,रितू निलजकर, नारायण पाटील, गणपती गुरव ,नामदेव मन्नोळकर, आनंत गावडा ,गणपती पाटील ,महेश सावंत ,अश्विनी चौगुले , नायकाप्पा घाडी, शिल्पा मादर ,लक्ष्मी गवाळकर तसेच होनकल केंद्रातील सर्व शाळा मुख्याध्यापक सहशिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक जोतिबा विठ्ठल घाडी यांनी तर आभार प्रदर्शन एस.डी सोनारवाडकर यांनी केले.
