# दि.५ एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक शनिवारी दि.२८ रोजी मलप्रभा ग्राऊंडवरील हनुमान मंदिराच्या पटांगणात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव ( गणेबैल ) उपस्थित होते.
प्रारंभी सेक्रेटरी सदानंद होसुरकर यानी बैठकीचा उद्देश्य स्पष्ट करून उपस्थित सदस्यांचे स्वागत केले.
यावेळी बैठकीत सन २०२५ सालातील पार पडलेल्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्चाचा अहवाल वाचन सेक्रेटरी सदानंद होसुरकर यानी केला.
यावेळी बैठकीत येत्या दि.५ एप्रिल रोजी जनरल मिटींग घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला सर्व सदस्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे यानी सन २०२६ मध्ये होणार्या कुस्ती आखाड्याचे नियोजन सर्व सदस्यानी एकत्रित येऊन पार पाडू. व कुस्ती आखाडा यशस्वी करू असे सांगीतले, यावेळी राजाराम गुरव ( कार्याध्यक्ष ) , माजी पैलवान यशवंत आल्लोळकर आ दी नी आपले विचार मांडले.
बैठकीला खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव( गणेबैल),माजी पैलवान यशवंत आल्लोळकर, कार्याध्यक्ष राजाराम गुरव,माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे, सेक्रेट्ररी सदानंद होसुरकर,उपाध्यक्ष रूद्राप्पा हिंडोरी,अर्जुन जांबोटी,हणमंत कोदाळकर, प्रकाश मजगावी,नागाप्पा पाटील , शंकर पाटील ,पांडुरंग पाटील,भाऊराव पाटील,मोहन निलजकर,कल्लापा निलजकर,जयवंत खानापूरकर,आदी सदस्य उपस्थित होते.
आभार उप सेक्रेटरी प्रकाश मजगावी यानी मानले.
