संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची नेटबाॅल खेळांडु अदिती डी.नाडगौडा हिची कर्नाटक राज्य ज्युनिअर १९ वर्षाखालील नेटबाॅल संघात निवड झाली आहे. ती उत्तर प्रदेश मधील मेरठा
येथे राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व करणार आहे.
अँमेच्योर नॅटबाॅल असोसिएशनने राज्यात नेटबाॅल संघाची निवड केली. या निवडीत कर्नाटक राज्य नेटबाॅल संघात सिटी निवड झाली.कर्नाटक राज्यातील अनेक प्रतिभावंत १९ वर्षाखालील नेटबाॅल खेळाडु उपस्थित होते.
मात्र खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची अदिती डी.नाडगौडा ही केवळ १२ वर्षाची खेळाडु तिच्या कौशल्याच्या जोरावर , उत्कृष्ट खेळामुळे तिची चाचण्यादरम्यान निवड झाली.
उत्तर प्रदेश ( मेरठा )येथे दि.२८ मार्च रोजी होणार्या राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेसाठी अदिती डी.नाडगौडा ही बेंगलोर येथून रवाना होत. कर्नाटक राज्य नेटबाॅल संघाचे नेतृत्व करणार आहे.
यावेळी अदितीला खानापूर बार असोसिएशन चेअरमन व घाडी फाऊंडेशनचे संस्थापक अँड.ईश्वर घाडी तसेच महाराष्ट्र बॅकेचे निवृत्त अधिकारी गणपती मोटेकर तसेच डाॅ.एन एल कदम यानी शुभेच्छा दिल्या.
अदिती डी.नाडगौडा हिने मिळविलेल्या य़शाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अदिती डी नाडगौडा ही खानापूर डाँक्टर असोसिएशन चेअरमन व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव डाॅ. डी.ई.नाडगौडा व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अँडमिन सौ दिव्या डी.नाडगौडा यांची कन्या होय.

