#तालुका मलप्रभा ग्राउंडवर सुविद्याचा वनवा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्याचा विकास होत आहे. असे सांगत असताना खानापूर शहरातील क्रिडापट्टूच मंदिर म्हणून ओळखणार्या शहरातील जांबोटी क्राँसजवळील तालुका मलप्रभा ग्राउंड मात्र भकास होताना दिसत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासुन तालुका मलप्रभा ग्राउंडचा विकासच नाही!
खानापूर शहराचा विस्तार वाढला. अनेक नवीन उपनगरे झाली. मात्र खानापूर शहरातील एकमेव तालुका मलप्रभा ग्राउंडचा विकासच झाला नाही. गेली १५ वर्षे जसे तालुका मलप्रभा ग्राउंड आहे.तसेच आहे.विकासाचा पत्ताच नाही.
त्यामुळे शहरासह तालुक्यातील खेळांडुना सर्व सोईनी युक्त असे ग्राउंड नसल्याने विविध खेळात सराव करण्यास वाव मिळत नसल्याने तालुक्याचा खेळांडू खचला आहे.
त्यामुळे शहरासह तालुक्यातील खेळाडुतुन नाराजी पसरली आहे.
मलप्रभा ग्राउंडची उभारणी झाल्यापासुन आजतागायत सरंक्षण भिंत नाही.त्यामुळे बेवारस जनावरे दिवसा ,रात्री ग्राउंडवर दिसतात.
ग्राउंडवर दिव्यांची सोय नाही!
दिवसा मलप्रभा ग्राउंडवर सुर्याच्या प्रकाशात खेळांडु खेळाचा सराव करू शकतो.मात्र सायंकाळी अंधार सुरू झाला की, खेळांडुना समस्या निर्माण होतात.
अंधार सुरू होताच मद्यपिचा सुळसुळाट!
तालुका मलप्रभा ग्राउंड हे शहराच्या खानापूर जांबोटी रोडवरील मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यातच ग्राउंडवर दिव्यांची सोय नसल्याने आंधारात मद्यपीचा सुळसुळाट असतो.त्यामुळे प्लॅस्टीक पिशव्या,काचेच्या बाटल्या, काचा पडलेल्या असतात.यामुळे खेळांडुना खेळाचा सराव करताना याचा त्रास होतो. यासाठी मलप्रभा ग्राउंडवर दिव्यांची सोय होणे गरजेचे आहे.
खेळांडुना पाण्याची सोय व शौचालय गरजेचे!
तालुका मलप्रभा ग्राउंडवर अद्याप पाण्याची सोय नाही.त्यामुळे खेळांडुना पाण्यासाठी धडपडावे लागते. ऐवढेच नव्हेतर एक सौचालय नाही. एक मुतारी नाही.
त्यामुळे खेळांडुच्या समोर मोठी समस्या उभी आहे.
मलप्रभा ग्राउंडवर एका खेळाचे मार्किंग केले नाही.धावपट्या सुध्दा नाहीत.त्यामुळे सराव करणार्या धावपट्टूना समस्या निर्माण होतात.
त्यामुळे मलप्रभा ग्राउंडवर वर्षभर क्रिकेट खेळ खेळला तर इतर खेळांचा पत्ता नसतो.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी तालुका, शहराच्या विकासा बरोबरच खानापूर शहरातील एकुलत्या एक तालुका मलप्रभा ग्रांउंडचा विकास करावा.व तालुक्यासह शहरातील खेळांडुना खेळासाठी प्रोहोत्साहित करून खेळात तालुक्याचे नाव अजरामर करावे.अशी मागणी खानापूर शहरासह तालुक्यातील खेळांडुतुन तसेच नागरीकांतुन होत आहे.
