#भाजपा राज्यकार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील करंबळ गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवी मंदिर समुदाय भवनाच्या जीर्णोद्धार निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम पाटील होते.यावेळी अवरोळी मठाचे स्वामी प.पु. श्री.चन्नबसव देवरू यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर,भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी , अँडव्होकेट चेतन मणेरीकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, अर्बन बॅकेचे चेअरमन अमृत शेलार, पी एल डी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, एम डी सदानंद पाटील , अशोक नार्वेकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, मोहन पाटील, शंकर पाटील, यशवंत बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक निवृत्त मुख्याध्यापक बी बी पाटील यानी केले. व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
समुदाय भवनाच्या जीर्णोध्दारनिमित्त देणगी बुकाचे उदघाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
आमदार फंडातुन १० लाखाचा निधी मंजुर करण्यात आला. या वेळी पाहुण्याच्याहस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश कवळेकर यानी केले.
आभार मा जी ग्राम पंचायत अध्यक्ष देवानंद घाडी यानी मानले.
