#सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आशिर्वाद हाॅस्पिटल मध्ये उद्या मंगळवारी दि. १७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत खास स्त्रियासाठी मोफत स्त्री रोग, प्रसुती,आणि वंध्यत्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिबीरात प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डाँ.गंगा लोकापूर हे महिलांची तपासणी करून विविध आरोग्य समस्या बाबत मार्गदर्शन करणार आहेत.मासिक पाळिचे विकार , गर्भ धारणा संबधित समस्या वंध्यत्व तसेच इतर स्त्रीरोगा बाबत तज्ञ्ज्ञ डाॅक्टर .गंगा लोकापूर मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय शिबीरात डाँक्टरकडुन मोफत रक्त दाब तपासणी, उंची, वजन , व बी एम आय.तपासणी,गर्भवती महिलासाठी एफ एच आर ( बाळाच्या हृदयाची धडक )तपासणी,तसेच गरजु साठी ब्लड शुगर( आर बी एस ) तपासणी व एच बी तपासणी,याशिवाय आयर्न सिरप,कॅल्शियमसिरप,मल्टिव्हिटामिन सिरप ,अँटासिड, वेदनाशामक औषधे,व आयर्न कॅल्शियम गोळ्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
तरी खानापूर तालुक्यातील महिलानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन आशिर्वाद हाॅसेपिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
