#मात्र खानापूर अर्बन बॅकेत शेतकर्याच्या मुलांना नोकरी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
डी सी सी बॅक म्हणजे शेतकर्याचा कणा आहे.डी सी सी बॅकेकडुन शेतकर्याना शुन्य टक्के व्याज, शेतीसाठी खते , बीयाने, मिळाली म्हणजे शेतकरी सुखावला असे नसुन आता पर्यत खानापूर तालुक्यातील मराठ्याच्या शेतकर्याच्या बेकार पदवीधर एका तरी मुलाला नोकरी मिळाली काय?
याचे उत्तर नाही.
तेव्हा डी सी सी बॅकेत खानापूर तालुक्यातील शेतकर्याच्या बेकार पदवीधर मुलाला नोकरी कधी मिळेल अशी आशा खानापूर तालुक्याच्या शेतकर्यातुन लागुन आहे.
गेली २० वर्षे डी सी सी बॅकेवर एक हाती सत्ता असताना डी सीसी बॅकेत सेवा निवृत्त झालेल्या जागेवर खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या शेतकर्याच्या बेकार पदवीधर एका तरी मुलाला नोकरी मिळणे गरजेचे होते.
मात्र गेल्या २० वर्षात खानापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या शेतकर्याच्या एकाही बेकार पदवीधर मुलाला नोकरी मिळाली नाही.हे तालुक्याचे ऩशीबच खोटे आहे.त्यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकर्याना काय मिळाले असा सवाल उपस्थित होतो.
दुसरीकडे खानापूर शहारातील अर्बन बॅकेत खानापूर तालुक्यातील शेतकर्याच्या बेकार पदवीधर अनेक मुलाना नोकर्यातरी मिळाल्या. याचे समाधान तालुक्यातील शेतकर्याना आहे.
कारण खानापूर तालुका मराठी भाषिक आहे.८० टक्के लोक मराठी भाषिक आहेत.तर २० टक्के लोक कन्नड भाषिक आहेत.
मराठी भाषिकाना कर्नाटकात नोकर्या मिळणे कठीण आहे. सरकारच्या कोणत्याही खात्यात मराठी भाषिकाना नोकरी मिळत नाही.मुल पदवी घेऊन बेकार आहेत . तेव्हा डी सी सी बॅकेत तरी गेल्या २० वर्षाच्या काळानंतर तरी नोकरी मिळणे गरजेचे आहे.
तेव्हा तालुक्यातील शेतकर्यानी डी सी सी बॅकेत मुलांच्या नोकरी साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा मुलाना बेकार राहण्याची वेळ येईल.
