भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल
संदेश क्रांती न्यूज:
आजच्या युगात बालका पासुन युवकापर्यत तसेच युवती पासुन महिलापर्यत हातात हजारो रूपयांचे माबोईल दिसतात.मात्र आंबोळी ( ता. खानापूर ) येथील पारायण सोहळ्यात वीसीतील युवक हातात वीणा घेऊन दिवसभर उभा असेलेला विठ्ठल भक्त युवक पाहूण आंबोळी गावातील युवक मोबाईलच्या मागे न लागता, हातात वीणा घेऊन विठ्ठलांचे नाम स्मरण करतात. दृश्य पाहुण मला आंबोळी गावची संस्कृती भक्तीमय असल्याची खात्री पटली.
असे विचार बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संजय कुबल यानी मंगळवारी दि.१० रोजी आबोळी गावच्या पारायण सोहळ्यात शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे यानात्याने बोलता ना व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठीवर शंकर शास्त्री, निलावडे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष अरूण गावडे, ग्राम पंचायत सदस्य व ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर,राजू जांबोटकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी शंकर शास्त्री यानी पाहुण्याचा परिचय करून पुष्प हार घालुन परिचय करून दिला.
या वेळी उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
दोन दिवस चालणार्या श्री ज्ञानेश्वर पारायण. सोहळ्याची सांगता बुधवारी महा प्र सा दाने होत आहे.
