#पळुन जाणारा कार चालक पोलिसांच्या हाती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव पणजी महामार्गावरील गुंजीनजीक दुचाकी व कार यांच्यात शनिवारी दि.६ रोजी झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला असुन त्याच्या वर बेळगांव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असुन त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आपघातावेळी कार चालक पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरीकानी पकडुन पोलिसाच्या हाती केले आहे.
आपघातातील जखमी हे गुंजी येथील तरूण भारताचे वार्ताहर रावजी बिरजे असुन त्याचे मित्र यशवंत जोशीलकर याची दुचाकी क्रमांक केए २२ ईझेड १४७२ या दुचाकी अँक्टिवावरून खानापूर हुन आपल्या गावी गुंजीला जात होते., तर याचवेळी लोंढ्याहुन खानापूरकडे येणार्या जी ए ०८ एबी २०२३ बलोनो कार चालकाने गुंजीपासुन काही अंतरावर असलेल्या कलमेश्वर मंदिरजवळ समोरून जोराची धडक दिली.
याधडकेत मागे बसलेले वार्ताहर रावजी बिरजे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
खानापूर पोलिसाची कार चालकावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.