
खानापूर (सुहास पाटील)
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर शहरात सोमवारी दि ५ मे रोजी मिलाग्रीस माता माऊली वार्षिक यात्रा साजरी होत आहे.
यानिमित्त यात्रेची तयार म्हणून शनिवारी दि २६ एप्रिल पासुन नऊ दिवसाची भक्ती सुरू झाली आहे.
खानापूर शहरातील सर्व ख्रिस्ती भाविक याभक्ती मध्ये मनोभावे सहभागी होऊन आपली अध्यात्मिक तयारी करत आहेत.
सोमवार दि.५ मे हा यात्रेचा पहिला दिवस तर मंगळवारी ६ मे रोजी यात्रेचा दुसरा दिवस आहे. दुसर्या दिवशी खानापूरातील १४ मुले ,मुली पहिल्यांदाच ख्रिस्त प्रसाद संस्कार घेणार आहेत. यात्रेच्यावेळी सर्वानी मिलाग्रीस माता माऊलीचे दर्शन घ्यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.