संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चन्नेवाडी ( ता.खानापूर) येथील बसशेड हे गेली कित्येक वर्षे रंगरोटी विना जीर्ण झाले होते. तसेच हे शेड गाववस्तीपासून अर्धा किलोमीटर दुर असल्याने तेथून येजा करणाऱ्या मद्यपींचा अड्डा बनले होते. त्यामुळे ते अस्वच्छ बनले होते.
आज होळी सणाचे औचित्य साधुन काही युवकांनी झाडाझुडपांनी व्यापलेल्या या बसशेड चा परिसर श्रमदानाने स्वच्छ केला. व स्वखर्चाने शेडची रंगरोटी करून नवीन रूप दिले. युवकांनी केलेल्या या कार्याला गावातील व येजा करणाऱ्या प्रवाशांनी कौतुकाची थाप दिली.
या परिश्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांचे मार्गदर्शन तर सौरभ पाटील, वेदांत पाटील,प्रेमानंद पाटील,सर्वोत्तम पाटील,कार्तिक पाटील,धीरज पाटील,गणेश पाटील,अंकुर पाटील,भरमु पाटील,यांनी भाग घेतला होता.

