#प्रवाशी,वाहनधारकातुन समाधान, बससेवेला प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिव स्मारक चौक ते करंबळ क्राॅस रस्ता गेल्या सहा महिण्यापासुन बंद होता.यासाठी खानापूर व्यापारी वर्गातुन बंद पुकारला होता.तसेच शेतकर्याच्या मागणीला लोकप्रतिनिधी व तहसीलदारानी सहकार्य केल्याने फिश मार्केट जवळील आडचण दुर करून सोमवारी दि.२ रोजी हा रस्ता वाहतुकीस पुन्हा सुरू करण्यात आला.
त्यामुळे यामार्गे बस सेवा ही सुरू झाली.
यारस्त्याबाबत शेतकर्याच्या मागणीचा तिढा शेतकर्याच्या सकारात्मक सहमती व सामंजस्य यामुळे सुटला.त्यामुळे खानापूर शहरासह, व्यापार बंधु, प्रवाशी वर्ग आदीतुन समाधान पसरले आहे.
रस्त्यासाठी जमीन दिलेेल्या शेतकर्याना सरकारकडुन योग्य आर्थिक मोबदला मिळवुन देण्यासाठी सर्व थरातुन प्रयत्न होणाऱ आहेत.
या वेळी शेतकरी राहुल सावंत, विनायक चव्हाण , मानसिंह चौगुले , संदीप देसाई, विश्वनाथ चौगुले ,नितीन पाटील, तसेच लोकप्रतिनिधी संबंधित खात्याच्याचे अधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
