#तहसीलदाराना निवेदन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचा विस्तार वाढला आहे.इतर व्यवसाय वाढले आहेत.मात्र खानापूर शहरातील फिश मार्केटसाठी कायमस्वरूपी जागा नाही .त्यामुळे मासे विक्रीदाराना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी खानापूर शहरातील मासे विक्रीदारानी फिश मार्केटसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी फिश मार्केट संघटनेचे मल्लेशी पोळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदाराना सोमवारी दि.२ मार्च रोजी निवेदन सादर करून जोरदार मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की ,खानापूर शहरात अनेक वर्षापासुन कायमस्वरूपी फिश मार्केट नाही आहे.सध्या बेळगाव पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीजवळील शेतकर्याच्या मालकीच्या जागेवर भाडे तत्वावर फिश मार्केट सुरू आहे.
परंतु बेळगाव पणजी महामार्गावरील १४ कोटी रूपयाचा निधी मंजुर करून गेल्या सहा महिण्यापासुन रस्त्याच्या कामाला सुरू केल्याने त्यातच फिश मार्केट जवळ सीडीचे काम वादात असल्याने रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे.रहदारी रस्ता योग्य नसल्याने व फिश मार्केट पर्यत रस्ताच नसल्याने ग्राहक येण्यास कठीण होत आहे.तेव्हा गेल्या सहा महिण्यापासुन फिश मार्केट व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने तसेच खासगी जागेवरील गाळ्याना मोठ्या प्रमाणात भाड्याची रक्कम असल्याने मासे विक्रिदाराना कर्जबाजारी व्हावे लागत आहे.तेव्हा खानापूर शहरात सरकारी जागेवर कायमस्वरूपी फिश मार्केट ची सोय करून द्यावी .अशा मागणीचे निवेदन फिश मार्केट संघटनेच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार याना देण्यात आले आहे.
यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी निवेदनाचा स्वीकार करून फिश मार्केटसाठी सोय करू असे आश्वासन दिले.
निवेदन देताना फिश मार्केट संघटनेचे अध्यक्ष मल्लेशी पोळ, सायमन डिसोजा,जेम्स लोबो, रोहित पोळ,हदीद हावलदार,व्हिक्टोर डिसोजा, राजू पोळ,फ्रान्सिस डिसोजा, सलुन पठाण,मालन पोळ आदी उपस्थित होते.

