संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
१४ कोटी रूपये निधीच्या खानापूर शहरातील अंतर्गत मराठा मंडळ महाविद्यालयापासुन ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्याचे काम गेल्या काही महिण्यापासुन सुरू असुन शहरातील दोन्ही बाजुनी रस्ता बंद झाल्याने व्यापारीवर्गाला व नागरीकाना मोठा फटका बस ला आहे.त्यातच फिश मार्केट जवळील रस्त्यासाठी जमिन गेल्याने आर्थिक नुकसान भरपाईच्या मागणी साठी शेतकर्यानी ही बंद ला प्रतिसाद देत गुरूवारी शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आला.
गुरूवारी सकाळ पासुन व्यापारीवर्गाने दुकाने बंद ठेवली होती.व्यापारी व नागरीकानी मोठ्या संख्येने शिवस्मारकातुन मोर्चा ला सुरूवात करून बाजार पेठेतुन चौरासी देवी ,पारिश्वाड क्राॅस हुन जांबोटी क्राॅसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.व तहसीदाराना निवेदन सादर केले.
निवेदन देताना महांतेश राऊत, अँड ईश्वर घाडी,मुऱलीधर पाटील,यशवंत बिरजे आदी समस्याबाबत आवाज उठविला व अधिकार्याना चांगलाच जाब विचारला.
यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार, अधिकारी गस्ती, चिफ आँफिसर संतोष कुरबेट ,पोलिस अधिकार्यासह फिश मार्केट परिसरात भेट देऊन शेतकर्याबरोबर चर्चा केली.
यावेळी शेतकर्यानी नुकसान भरपाई मागणी मान्य होई पर्यत रस्त्याला विरोध राहणार असे ठाम सांगीतले.
यावेळी तहसीलदारानी सदर प्रकरन न्यायालयात असल्याने नुकसान भरपाईसाठी अवश्यक ती कागदपत्रे प्रशसनाला देण्यात येतील असे सांगीतले तेव्हा मागण्या मान्य झाल्यास आमचा विरोध नाही असे सांगीतले.य़ावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.
या वेळी व्यापारी वर्ग प्रदीप शेट्टी, राजेंद्र रायका,महमद नंदगडी, मल्लेशी पोळ , अभिषेक शहापूरकर, शंकर सुळकर ,गुलाब जैन, दीपक मांजेरकर, राहुल पाटील,गुंडू टेक डी,संजय मोरे आदी शेकडो व्यापारी उपस्थित होते. सर्वाचे लक्ष आता पुढील निकालाकडे लागुन आहे.

