#ता.प.च्या ८ गाळ्यावर हातोडा!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरांर्तगत शिवस्मारक चौक ते जांबोटी क्राॅस पर्यतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासुनचा प्रयत्न होता.
शिव स्मारक चौकापासुन चुना कोर्ट पर्यतचे गाळे हे तालुका पंचायतीच्या मालकीचे होते.गेली अनेक वर्षापासुन तालुका पंचायतीकडे जुने गाळे काढुन व्यापर संकुलन उभारण्याची मागणी तालुका पंचायतीच्या सदस्याकडुन होत होती.मात्र याला कदीच मुहूर्त मिळाला नाही.तो मुहूर्त शुक्रवारी दि. २७ रोजी मिळाला.
१४ कोटी रूपयेच्या निधीची मंजुरी व शहरांतर्गत रस्त्याचे रूंध्दीकरण!
खानापूर शहरांतर्गत मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्याच्या कामाला १५ कोटी रूपयाचा निधी मिळाला. आँक्टोबर पासुन शहरांतर्गत रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला.
त्यातुनच शिव स्मारक चौकापासुन खानापूर शहरांतर्गत रस्त्याच्या रूंध्दीकरणाची मागणी होऊन, रस्त्याच्या रुंध्दीकरणासाठी अतिक्रमण हटाव हा प्रश्न सर्वानीच लावुन धरला.त्यामुळे यासाठी उपोषन ,मोर्चा , निवेदन आदी कामे हाती घेतल्याने रस्त्याच्या रंध्दीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहिम नगरपंचायतीने हाती घेतली.त्याला यश मिळाले.
#शुक्रवारी नगरपंचायतीने अतिक्रमणसाठी उचलला हातोडा !
गेल्या अनेक वर्षापासुनचा अतिक्रमण हटाव हा प्रश्न मार्गी लागला.शुक्रवारी दि.२७ रोजी सकाळी ११ वा जता नगरपंचायतीचे चिफ आँफिसर संतोष कुरबेट,अभियंते गंगाधर कांबळे, तसेच प्रेमानंद नाईक,राजू जांबोटकर यानी आपल्या कर्मचार्यासोबत शिवस्मारक चौकात यंत्रणासह हजारी लावली.यावेळी पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला.
शिव स्मारक चौकातील शिवस्मारकातील ग्रील कंपाऊड ही काढले.
या वेळी तालुका पंचायतीचे जवळपास ८ गाळ्याचे ६ फूट अतिक्रमण हटावण्यात आले आहे.
या वेळी पोलिस बंदोबस्तात जे सी पी च्या सहाय्याने गाळ्यांचे अतिक्रमण हटविले.
या वेळी लोकाची एकच गर्दी झाली होती.

