संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हेस्काॅमच्या इलेट्रिकल असोसिएशन तक्रार निवारण बैठक नुकताच पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर हेस्काॅम खात्याचे कार्यनिर्वाहक अभियंते प्रवीण बळगार होते.
या वेळी इलेट्रिक असोसिएशन च्या वतीने विविध समस्या मांडल्या.यामध्ये शाखाधिकारी कार्यालयातुन वेळेवर कामे होत नाहीत.आर.आर.नंबर घेण्यास विलंब होणे,नावात बदल होणे,भार वाढवणे, शेतकी पंप, घराचा उतारा,अशा अनेक समस्या मांडल्या.
या वेळी खानापूर हेस्काॅम खात्याचे कार्यनिर्वाहक अभियंते प्रवीण बळगार समस्या जाणुन घेऊन यावर त्वरित तोडगा काढुन समस्या सोडवू .असे आश्वासन दिले.
या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू पार्कर यानी आभार. मानले.