संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावची कन्या कुमारी मनाली सतीश सिध्दाणी ही आय.टी.बी.पी. लष्करीत भरती होऊन आसाम ये थे गेल्या सहा महिण्याचे कठीण प्रक्षिण प्रामाणिक पणे पार पाडुन यावेळी कसम प्रेडला आई वडीलासमवेत उप स्थिती लावली.
ती नुकतचा गर्लगुंजी ( ता. खानापूर ) ये थे पहिल्यांदाच सुट्टीवर आली.यावेळी गर्लगुंजी ग्रामस्थानी लष्करी कन्या कुमारी मनाली सतीश सिध्दाणी हिचे शानदार स्वागत करण्यात आले.
या स्वागत समारंभाला गावकर्यानी दारात रंगीत रांगोळ्या काढुन तसेच फटाक्यांच्या आताषबाजीने स्वागत केले.
यावेळी वडील सतीश सिध्दाणी, तसेच पी के पी एस माजी चेअरमन राजू सिध्दाणी व पीकेपीएसचे मॅनेजर सातेरी बिरजे आदी मान्यवरानी लष्करी कन्या कुमारी मनाली सतीश सिध्दाणी हिचे शाल, पुष्पहार घालुन जोरदार स्वागत केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

