#विविध तालुका अधिकार्यांची नेमणूक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपल्याने जिल्हाधिकार्यानी खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीवर तालुक्यातील विविधखात्याच्याअधिकार्याना
प्रशासक म्हणून नेमणुक केली आहे.
नवीन निवडणुक होऊन निवडुन आलेल्या सदस्यांकडे अधिकार सोपविपर्यत प्रशासक कामकाज पाहणार आहेत.अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकार्यानी बजावले आहेत.
#खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा.पं.वर नेमण्यात आलेले प्रशासक खालीलप्रमाने!
तालुक्यातील हेब्बाळ, करंबळ,मणतुर्गा,भुरूणकी, लिंगनमठ, या ग्रा.,पं.सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी,नंदगड, नेरसा रामगुरवाडी,आमटे
देवलती या ग्रा.पं.वर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी,क.नंदगड बेकवाड,शिंदोळी,कोडचवाड,क.बागेवाडी,या ग्रा.पं.,वर सहाय्यक अभियंता जलजीवन मिशन तसेच पशु वैद्याधिकारी, चापगांव,लोकोळी,बरगांव,तोपिनकट्टी,
इदलहोंड,या ग्रा पं.वर तर सहाय्यक कृषी संचालक गोधोळी, हलगा,हलशी,बिजगर्णी,गुंजी,कापोली के.सी.सहाय्यक निर्देशक पशुसंगोपन,शिरोली, नागरगाळी, लोंढा,घोटगाळी,मोहिशेत, व सहाय्यक पाटबंधारे खाते जांबोटी,बैलूर ,गोल्याळी, निलावडे, गर्लगुंजी, व सहाय्यक अभियंते निट्टूर,कणकुंबी,पारवाड, नागुर्डा,हलकर्णी, तर सहाय्यक कार्यकारी अभियंते हेस्काॅम बिडी,नंजिलकोडल ,मंग्यानकोप,केरवाड,
,कक्केरी, आणि बीईओ अधिकारी गंदिगवाड,पारिश्वाड,इटगी,हिरेमन्नळी,
हीरेहट्टीहोळी,या ग्रा.,पं.प्रशासक नेमले आहेत.

