संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीय स्कूल व पदवी पूर्व काॅलेजच्या संयुक्त विद्यामाने ७७ वा प्राजस्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांवचे प्रसिद्ध डॉ.वरदराज प्रल्हाद गोकाक उपस्थित होते.
या वेळी स्कूल चेअरमन अँड. चेतन मणेरीकर, व संचालक तसेच काॅलेजचे प्राचार्य पी के चापगावकर, स्कूलचे मुख्याध्यापक विनोद मराठे, आदी उपस्थित होते.
या वेळी पाहुण्याच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
या वेळी बोलता ना अँड.चेतन मणेरीकर म्हणाले की , डॉ. वरदराज गोकाक यानी श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काॅलेजच्या विद्यार्थ्यासाठी २लाख ४८ हजार रूपये किमतीची ६ संगणक संच आणि प्रिंटर देणगी दाखल दिल्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने डाॅ.वरदराज गोकाक व सौ गोकाक यांचे आभार मानुन त्यांचा सत्कार केला.
या वेळी काॅलेज व स्कूलच्या विद्यार्थ्यानी कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

