संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कसबा नंदगड (ता.खानापूर) शर्यत कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने उद्या गुरूवार दि.२२ रोजी भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील उपस्थित राहणार आहेत.
शर्यतीचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.
या वेळी दिपप्रज्वलन व फोटो पुजन उपस्थित पाहुण्याच्या हस्ते होणार आहे.
दोन गटात होणार्या बैलगाडी श व्यतीत
मोठ्या गटासाठी अनुक्रमे बक्षिसे ५१ हजार रूपये,४१ हजार रूपये,३१हजार रूपये अशी एकूण १२ बक्षिसे तर लहान गटासाठी अनुक्रमे २५ हजार रूपये,२१ हजार रूपये,१८ हजार रूपये,१५ हजार रूपये अशी एकूण १२ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तेव्हा बैलजोडी मालकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजकानी केले आहे.

