#त्याच्या ८ व्या पुण्यस्मरण निमित्त त्यांचा थोडक्यात परिचय!
संदेश क्रांती न्यूज :
कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील झाडनावगे या छोट्याश्या गावात शेतकरी कुटूंबात झाला.घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही.
त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्याना खानापूर शहरातील सिरॅमिक कारखाण्यात काही वर्षे मजुर म्हणून काम करावे लागले.
कारखाण्यात काम करता करता त्यानी लाकूड व्यवसाकडे वळले.आणि या लाकडु व्यवसायात त्यानी आपला जाम बसविला. लाकूड व्यवसाय करता करता त्यानी प्रगती करत राजकरणाकडे वळले, आणि त्यानी महाराष्ट्र एकीकरण समितीत सहभागी झाले.
या वेळी त्याना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेब्बाळ तालुका पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडू आणले. परंतु केवळ दोन महिने सेवा बजावुन आपल्या तालुका पंचायत सदस्य पदाचा राजीनाम देऊन.त्यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी त्याची खानापूर तालुका भाजप तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.
तेव्हा पासुन भाजप पक्षाला बळकटी आली.
तालुक्यात भाजप पक्ष मोठा करण्यासाठी त्यानी आपले प्रयत्न सुरू केले. व सन १९९९ ते २००४ मध्ये विधानसभा निवडणुक लढविली.मात्र निसटता पराभव पत्करावा लागला. परंतु पराभावामुळे खचुन न जाता , पुन्हा जोमाने कामाला लागले.व पुन्हा २००८ साल ची विधान सभा निवडणुकीत त्याना पुन्हा भाजप पक्षाची उमेदवारी देण्यात आली. ही निवडणुक लढवून त्यानी विजय संपादन केला.व खानापूर तालुक्याचा भाजपचा पहिला आमदार होण्याचा मान मिळविला.
खानापूर तालुक्यात इतिहास घडविला.
राज्यात भाजप पक्षाचे सरकार असल्याने सत्तेचा पुरे पूर लाभ उठवत त्यानी खानापूर तालुक्याचा सर्वागीन विकासासाठी प्रयत्न केले.
खानापूर तालुक्याच्या विविध भागातील रस्ते, पुल , पाणी तसेच योजना मार्गी लावल्या.तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी, यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले.
खानापूर शहरातील मलप्रभा नदीवर नगरोत्थान योजनातुन भव्य घाटाची निर्मिती केली. त्यांच्याच प्रयत्नातुन धारवाड़ -गोवा राज्य मार्ग विकासाचा प्रश्न ही मार्गी लावला.खानापूर शहरात मलप्रभा क्रिडांगण,मिनी विधानसौध , असोगा गावचा मलप्रभा नदीवरील पुल, याज बरोबर अनेक महत्वकांक्षी विकासकामे त्यानी मार्गी लावली.
खानापूर तालुक्यातील बंद पडलेल्या भाग्यलक्ष्मी साखर कारखाण्याचे खाजगीकरण करून तो पूर्ववत सुरू केला.शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधली.
खानापूर तालुका जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीत भाजपला विजयी करण्यात कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यामुळेच कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणीची आठवण खानापूर तालुक्यातील नागरीकांच्या स्मरणात चिरकाल ठेवणारी आहे.