#चिगेळ क्रिकेट संघाने दुसर्या क्रमांकासह २० हजार रूपये जिंकले!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चिगुळे ( ता.खानापूर ) येथील माऊली चॅलेजर्स यांच्या आमदार क्रिकेट स्पर्धा नुकताच पार पडल्या.या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याना पहिले बक्षिस ३७,७७७ रूपये व दुसरे बक्षिस २०,००० रूपये अशी बक्षिसे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षिस गोल्याळी संघाने पटकावले. तर दुसर्या क्रमांकाचे बक्षिस चिगुळेच्या माऊली चॅलेजर बाॅयज संघाने पटकावले. व दुसर्य़ा क्रमांकाचे २०,००० रूपयाचे बक्षिस पटकावले.,लागलीच यातील ५,००० रूपये रक्कम चिगुळेच्या माऊली चॅलेजर बाॅयीज संघाने आपल्या चिगुळे गावच्या सरकारी प्राथमिक मराठी शाळेला देणगी दाखल देऊ केले.त्यामुळे चिगुळेच्या माऊली चॅलेजर बाँयज क्रिकेट संघाचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
याचा आदर्श खानापूर तालुक्यातील विविध क्रिडा संघानी घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.


