#विविध मान्यवराची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी गेली १७ वर्षे ज्ञानवर्धीनी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आयोजित करण्यात येणार्या व्याख्यान
मालेचा सांगता समारंभ रविवारी दि.८ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील लोकमान्य भवनात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन. पीटर डीसोझा उपस्थित राहणार आहेत.
या वेळी दिपप्रज्वलन डी डी पी आय लिलावती हिरेमठ ,वरिष्ठ सेवा मेडल विजेते कर्नल व्ही.के.बी.के. डी. पाटील, लोकमान्य एज्यूकेशन सोसायटीचे संचालक डाॅ.डी.पी वागळे,रोटरी क्लब बेळगावचे माजी अध्यक्ष डी.बी.पाटील,उद्योजक मारूती वाणी,आदीच्याहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी प्रश्न पत्रिका संचचे प्रकाशन खानापूरचे बीईओ पी.रामाप्पा प्राचार्या शरयू कदम, डाॅ.गोविंद मिसाळे, मंजुनाथ अळवण, उद्योजक लक्ष्मण मोरे आदीच्याहस्ते होणार आहे.
#ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्कारचे वितरण !
सालाबाद प्रमाणे यंदाही ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठनच्यावतीने दिल्या जाणार्या ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न होत आहे.
ज्ञानवर्धिनी ज्ञान रत्न पुरस्कार डाॅ. स्नेहा कृष्णाजी देसाई याना देण्यात येणार आहे. तर वैयक्तिक समाजसेवा पुरस्कार नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लापा गुरव याना देण्यात येणार आहे.ज्ञानवर्धिनी जीवन गौरव पुरस्कार विश्व भारत सेवा शिक्षण समितीचे संस्थापक व माजी आमदार गुरूवर्य परशुराम भाऊ नंदीहळ्ळी याना देण्यात येणार आहे.
तसेच दहावीच्या २०२५ मधील वार्षिक परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याना बक्षिस देऊन गैरविण्यात येणार आहे.हायस्कूल विभागातील निवृत्त शिक्षकाचा तसेच व्याख्यान मालेतील रिसोर्स पर्सन म्हणून सेवा बजावलेल्या शिक्षकाचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

