#माजीआम.अरविंद पाटील पॅनलचे ९ विजयी उमेदवार तर शेतकरी सहकार पॅनलचे २ उमेदवार विजयी
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटी च्या पंच वार्षिक सोसायटी ची निवडणुक रविवारी दि. ४ जानेवारी रोजी चुरशीने पार पडली.
यापंचवार्षिक निवडणुकीत चापगाव पी के पी एस सोसायटीसाठी दुरंगी लढतीत माजी आमदार अरविंद पाटील पॅनल विरूद्ध शेतकरी सहकार पॅनल अशी लढत होऊन या निवडणुकीत अरविंद पाटील पॅनल. मधुन सामान्य कर्जदार पुरूष गटातुन अशोक मष्णू बेळगावकर, उदय मनोहर पाटील,भरमाणी टिक्कापा जिवाई,रूद्राप्पा मुदकाप घार्शी,सागर जिवाप्पा कडबी, हे पाच ही उमेदवार निवडुन आले.तर शेतकरी सहकार पॅनल मधुन एक ही उमेदवार निवडुन आला नाही
परिशिष्ट जाती कर्जदार गटातुन शेतकरी सहकार पॅनलचे शिवाजी बसाप्पा मादार हे निवडुण आले ,.
सामान्य महिला कर्जदार गटातुन माजी आमदार अरविंद पाटील गटाच्या द्राक्षायणी हणमंत पाटील व लक्ष्मी फोडु अंबोजी या निवडुन आल्या. तर शेतकरी सहकार पॅनलच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.
सामान्य कर्जदार पुरूष ब गटाचे शेतकरी सहकार पॅनलचे उमदेवार पिराजी मष्णू कुर्हाडे हे निवडुण आले आहे.
तसेच सामान्य बिन कर्जदार पुरूष गटातुन मा जी आमदार अरविंद पाटील पॅनलचे गोविंद यल्लापा धबाले हे विजयी झाले आहेत. तसेच अ वर्ग गटातुन माजी आमदार अरविंद पाटील पॅनलचे सिकंदर दादासाहेब सनदी हे उमेदवार बिन विरोध निवडुन आले आहेत.
चापगांव गावच्या पी के पी एस सोसायटीची यंदाची पंचवार्षिक निव़डणुक ही प्रतिष्ठेची होती. एकीकडे मा जी आमदार व डी सी सी बेॅकेचे संचालक अरविंद पाटील यानी पॅनल उभारून विरोधकाना एक आवाहन दिले आहे.
त्यामुळे अरविंद पाटील पॅनल विरूद्ध शेतकरी सहकार पॅनल अशी रंगत लढत होती . या लढतीत माजी आमदार अरविंद पाटील पॅनलचा विजय झाला आहे.

