कै. सौ. अन्नपूर्णा हणमंतराव गुरव
स्वर्गवास : शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५
प्रेमळ पत्नी, मायेची आई, सुसंस्कृत सून व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सर्वांच्या स्मरणात सदैव राहतील. त्यांचा शांत, संयमी व सेवाभावी स्वभाव कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिचितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.
या दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे, संदेशांद्वारे तसेच सामाजिक माध्यमांतून ज्यांनी आम्हांस धीर दिला व सांत्वन केले, त्या सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, मान्यवर व हितचिंतकांचे गुरव परिवार मनःपूर्वक आभारी आहे.
शोकाकुल
पती: श्री. हणमंतराव मल्हारी गुरव
माजी सैनिक, अध्यक्ष – खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना
मुलगा: श्री.विवेकानंद हणमंतराव गुरव
सून: सौ. निकिता विवेकानंद गुरव
मुलगा: श्री.दयानंद हणमंतराव गुरव
सून: सौ. रोहिणी दयानंद गुरव
मुलगी : सौ.अक्षता सुनील तरीहाळकर
जावई : श्री सुनील तरीहाळकर (कर्ले)
नातवंडे,बहीण,भाऊ, भावजय, आप्तेष्टे व समस्त गुरव परिवार,गणेबैल, ता. खानापूर व लक्ष्मी नगर गणेशपुर बेळगाव