सौ.ए.डी.चोपडे याचा निवृत्तनिमित्त सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मनुष्याच्या जीवनात सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे विद्या ज्ञान होय. विद्या ज्ञान देण्याचे सर्वानाच भाग्य लाभत नाही.म्हणून शिक्षकी सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे.असे विचार खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुक ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी बुधवारी दि.२४ रोजी नागुर्डावाडा सरकारी मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए डी चोपडे यांच्या सेवानिवृत्ति निमित्त सत्कार सोहळ्यात बोलता ना व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, आजच्या युगात महिला पुरूषाच्या बरोबरीने काम करतात. महिला पंतप्रधान झालेत.राष्ट्रपती झालेत, वैमानिक झालेत.त्यामुळे महिलानी चुल आणि मुल म्हणून न राहता पुढे आले पाहिजेत, आज मुख्याध्यापिका सौ. ए .डी. चोपडे यानी ३० वर्षे शिक्षकी सेवा बजावली आहे.अनेक विद्यार्थी इंजिनियर, डाँक्टर, वकील, शिक्षक तसेच उद्योजक बनले आहे.हे पुन्याचे काम केवळ आणि केवळ शिक्षकच करू शकतो.असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस .डी .एम .सी अध्यक्ष अनंत हुंदरे उपस्थित होते.
व्यासपिठावर खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाँक काॅग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी, बीईओ पी रामाप्पा , निरंजनसिंह सरदेसाई, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी,ए बी मुरगोड,विजय गुरव, शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष जयकुमार हब्बळी,उपाध्यक्ष कृष्णा राचय्यां, निलावडे ग्राम पंचायत सदस्य विनायक मुतगेकर तसेेच एसडीएमसी उपाध्यक्ष रवळू पाखऱे, सर्व सदस्य, व कृष्णा धुळाचे ,शिवाजी पाखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात पाहुण्याच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
या वेळी श्री लोहार यानी सत्कारमुर्ती सौ ए डी चोपडे यांचा परिचय करून दिला.
या वेळी बीईओ पी. रामाप्पा, आबासाहेब दळवी, निरंजनसिंह सरदेसाई,
,ए.बी. मुरगोड,जयकुमार हेब्बळी,आदीनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती सौ. ए. डी. चोपडे म्हणाले की, गेल्या ३० वर्षाच्या काळात शिक्षकी सेवेत राहुन मला जो आनंद मिळाला. तो आनंद इतर कोणत्या सेवेत मिळाला नसता.शिक्षकी सेवेत असताना गावकर्याचे सहकार्य तसेच शिक्षकाची मदत यामुळेच मी ३० वर्षाचा काळ आनंद घालवला.आज माझ्याबद्ल गौरवोद्दगार काढल्याबद्दल मी सर्वाची ऋणी आहे.अशी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला रवळू वडगांकर,कृष्णा महाजन,बाबू हुंदरे, बाळू बीर्जे, तानाजी चापगांवकर, तसेच निलावडे केंद्राच्या सीआरपी, मुख्याध्यापक , शिक्षक तसेच गावचे नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.एच.कौदलकर यानी केले.
तर आभार बापू दळवी यानी मानले.

