(( सुहास पाटील याजकडूुन)
मुळच्या इदलहोंड ( ता.खानापूर ) गावच्या सौ.ए.डी. चोपडे यांचा जन्म १ आँगष्ट १९६५ रोजी एका शेतकरी कुटूंबात झाला.त्याचे प्राथमिक शिक्षण इदलहोंड येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण ज्योतिराव फुले विद्यालय गर्लगुंजी ( इदलहोंड ) येथे पार पडले.तर बारावी पर्यतचे शिक्षण आर पी डी काँलेज बेळगाव ये थे झाले. तर टी.सी.एच काँलेज बेननस्मित ट्रेनिंग काँलेज येथे सन १९९३ -९४ साली पार पडल्यानंतर लागलीच नोकरीच सुरूवात २९ -१२- १९९५ साली सरकारी मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळा नागुर्डा (ता.खानापूर ) या शाळेतुन झाली. या शाळेत २९ डिसेंबर १९९५ ते २३ जून २०१५ पर्यत १९ वर्षे ६ महिने सेवा बजावली. तेथून त्याची बदली जवळ असलेल्या सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा नागुर्डावाडा ये थे झाली.याशाळेत त्यानी २४ जून २०१५ पासुन ते १ आँगष्ट २०२५ रोजी निवृत्त होई.तो पर्यत मुख्याध्यापक म्हणून १० वर्षे १ महिना ८ दिवस प्रामाणिकपणे सेवा बजावली.शिक्षकी पेशेत असताना विद्या ज्ञानाबरोबच धावणे, लांब उडी, उंच उंडी सारख्या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले.त्याना २८ मार्च २०२५ रोजी आंतर राष्ट्रीय महिला पुरस्कार प्राप्त झाला.
नागुर्डावाडा ( ता. खानापूर ) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए .डी.चोपडे या आपल्या ३० वर्षा प्र दीर्घ शिक्षिकी सेवेतुन निवृत्त झाले आहे.
या निमित्त आज बुधवारी दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नागुर्डावाडा येथील श्री गणेश मंदिर समोर सेवानिवृत्ति निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावची पंच कमिटी ,गावचे ग्रामस्थ,शिक्षकवर्ग,आजी माजी विद्यार्थी, मित्रमंडळी तसेच नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व निलावडे सी आर सी केंद्रातील सी आऱ. पी. मुख्याध्यापक व
शिक्षकवर्ग आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.