#कर्नाटक छत्रिय मराठा परिषद पदाधिकार्याच्यावतीने सत्कार !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव येथील भूषण काकतकर यांच्या अरूण इंजिनिअर उद्योगाला किर्लोस्कर कंपनी तर्फे उत्तम पुरवठादार म्हणून गौरविण्यात आले.
या निमित्त कर्नाटक छत्रिय मराठा परिषदेच्या पदाधिकार्याच्या वतीने सत्कार सोहळा दि.१६ नोव्हेबर रोजी उद्योजक भूषण काकतकर यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
किर्लोस्कर कंपनीच्या एकूण ८०० वेंडर्स मधून अरुण इंजिनिअरिंग कंपनीची निवड करण्यात आली, त्याबद्दल कर्नाटक छत्रिय मराठा परिषदेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या सत्कारप्रसंगी, के. के. एम. पी. चे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, जिल्हा सेक्रेटरी संजीव भोसले, बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष सतीश बाचीकर व खानापूरचे प्रवीण सुळकर उपस्थित होते.
