संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व. खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी हे आपल्या कुटूंबासह नुकताच तिरूपती बालाजी दर्शन घेऊन उत्साहित झाले आहेत.
या निमित्ताने खानापूर वकील संघटनेच्या पदाधिकार्याना व सदस्याना तिरुपति बालाजीचा प्रसाद देऊ केला.
या वेळी बोलताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी म्हणाले की, तिरुपति बालाजीचे दर्शन घेऊन मन उत्साहित झाले. दर्शनासाठी बराच वेळ रांगेत उभे राहुन कित्येक तासानी दर्शन झाले.यावेळी खानापूर तालुक्यात सुख,समृध्दी लाभो.अशी प्रार्थना केली.
आपल्या सोबत घाडी फाऊंडेशन च्या सौ पार्वती घाडी, कन्या मयुरी घाडी ही होत्या.
खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यांचा तिरूपती बालाजी दर्शन व प्रवास सुखकर झाल्या निमित्त वकील संघटनेच्यावतीने अँड. एस के नंदगडी यानी फर टोपी घालुन सत्कार केला.
या वेळी वकील संघटनेचे अँड.एस के नंदगडी, अँड.एच डी लोकरे,अँड. सुरेश भोसले, अँड.जी जी पाटील, अँड.एच एन देसाई, अँड.जी.एम . देसाई, अँड.आर.एन. पाटील, अँड.एम ए मुल्ला, अँड.महादेव पाटील, संदीप शेमले तसेच समाज सेवक रेव्हण सिध्दया हिरेमठ व इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
