#थ्रो बॉल खेळाडूंची विभागीय पातळीवर निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ संस्थेच्या
ताराराणी हायस्कूलच्या खेळाडूंनी थ्रो बॉल स्पर्धेत नुकताच बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत यश संपादन केले आहे .
आता त्यांची निवड विभागीय पातळीवर झाली आहे. या खेळाडूनी उपांत लढतीत बैलहोंगल संघाचा 2/0 असा पराभव करून अंतिम लढतीत सौंदत्ती या संघाचा 2/0 असा पराभव केला. व आपले नाव जिल्हास्तरीय सतत दोन वर्षे सातत्याने ठेवले आहे. या स्पर्धेमध्ये कॅप्टन सातुली गावकर ,वरूना पोटे, अस्मिता पाटील, पवित्रा गस्ती, समीक्षा गावकर, प्रेमीला मेंडीलकर, गीता डिगेकर ,वर्षा मेंडिलकर ,शांभवी मरतुर या खेळाडूने भाग घेतला होता.
यावेळी खेळाडूंना उद्देशून बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू म्हणाल्या की,”संघर्ष जितका कठीण असेल तितकंच यश गौरवशाली असते. हे यश ताराराणी हायस्कूलच्या खेळाडूंनी मिळवले आहे. असे मत व्यक्त केले.
या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर. राजश्रीताई नागराजू व संचालक श्री शिवाजीराव पाटील तसेच ज्येष्ठ संचालक परशुराम अण्णा गुरव,शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन .जाधव या सर्वांचे प्रोत्साहन मिळत आहे. शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी टी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.जिल्हास्तरीय यशाबद्दल सर्व थ्रो बॉल खेळाडू चे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
