संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पणजी बेळगाव रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन शेजारी श्री गणेश मंदिरात सोमवार दिनांक 17 रोजी सायंकाळी कार्तिक मास निमित्त दीपोत्सव पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गणेश मंदिरात सर्वत्र दीप लावण्यात आले होते. दीपोत्सव कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पुरोहित सुनील नायक यांच्या कडून गणेशाची विधिवत पूजा करण्यात आले.
तर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
दीपोत्सव कार्यक्रमाला भाजप नेते राजेंद्र रायका, बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या सौ धनश्री सर देसाई, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, जयराज माकावी,रवी पाटील, प्रकाश देशपांडे, विठ्ठल पाटील, रवी बडगेर, बबन आल्लोळकर,हणमंत हट्टीकर, सौ. माकावी सौ अर्चना रायका तसेच खानापूर शहरासह तालुक्यातील भक्त दीपोत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
