संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका अति जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यात जंगली प्राणी सतत फिरत असतात. पिकाचे नुकसान होत असते. अशावेळी जनतेने सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच आपण काही जबाबदाऱ्या घ्यावयाचे आहेत.
यासाठी वन खात्याच्या कडून काही सूचना करण्यात येत आहेत.
तालुक्याच्या काही जंगल भागात जंगली प्राणी आढळल्यास त्या भागामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत जंगलातून प्रवास टाळावा. जंगली प्राणी दृष्टीस पडताच वनखात्याला त्वरित संपर्क करून, जाणीव करून द्यावी. जंगली प्राण्यांचे रक्षण करावे. त्यांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. याची जबाबदारी घ्यावी.
जंगली प्राण्यांच्या जवळ जाणे टाळावे. तसेच त्यांना इजा करणे. किंवा त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष काळजी घ्या. जंगली प्राणी आढळल्यास त्वरित थांबा. शांत रहा आणि सुरक्षित अंतर ठेवा.
नागरिकांनी काय करू नये.!
जंगल भागात कचरा,प्लास्टिक, बाटल्या किंवा इतर वस्तू फेकू नका.
जंगलात ध्वनी प्रदूषण करू नका.
जंगलात मद्यपान करू नका. दारूच्या बाटल्या टाकू नका.
जंगली प्राण्यांना त्रास होईल अशा प्रकारे त्यांचे फोटो अथवा व्हिडिओ करू नका.
रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांना त्रास देण्यासाठी प्रखर लाईट वापरू नका.
जंगली प्राण्यांना खायला घालण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच जंगली प्राण्यांचे व वनस्पतींचे सुरक्षित संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
अशी माहिती आर. एफ. ओ. श्रीकांत पाटील यांनी तालुक्याच्या जंगल भागातील जनतेला आव्हान केले आहे.
नुकताच खानापूर तालुक्यातील कुंभार्डा, कोडगई भागात वन खात्याच्या वतीने वन प्राणी संवर्धन कार्यक्रमात या भागातील नागरिकांना माहिती देण्यात आली.
यावेळी या भागाचे आर एफ ओ. सय्यद साब नदाफ, उप वलय अधिकारी शिवानंद शिवशिंपी, उपवलय अधिकारी वर्षा कदम व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला कोडगई, कुंभार्डा आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

