संदेश क्रांति न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका माध्यमिक शाळांचे विज्ञान प्रदर्शन सर्वोदय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकताच पार पडले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलचे विज्ञान शिक्षक एस एम मुतगी यांना बेळगाव जिल्हा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य फादर नेल्सन पिंटो होते. व्यासपीठावर नोडल अधिकारी श्रीमती लोकापुरे, श्री. बिरजे, बीआरपी क्रांती पाटील, श्री. फेलिक्स व सत्कारमूर्ती एस.एम.मुतगी, आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण 38 हायस्कूलच्या मॉडेल्सनी भाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक पार्थ रामा इसरानी. शिवठाण हायस्कूल, दुसरा क्रमांक अंथोनी लॉट्रीक्स, सर्वोदय इंग्लिश मीडियम स्कूल, तिसरा क्रमांक एन एम एच एस हायस्कूल बीडी यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कमार यांनी केले.
