“तहसील कार्यालय, नगरपंचायतीवर मोर्चा काढून निवेदन”
संदेश कांती न्यूज,:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील सिरॅमिक प्रॉडक्ट लिमिटेडने 1947 मध्ये सर्वेक्षण क्रमांक 93/ए.1. मधील 16 एकर 17 गुंठे जमीन 99 वर्षाच्या कायमस्वरूपी भाडेपट्टी भूखंड मिळाला होता. त्यानंतर कंपनीने आम्हाला भविष्य निर्वाह निधी दिला नाही. म्हणून आम्ही 1994 आणि १९९८ मध्ये कामगार न्यायालयात धाव घेतली. आणि कामगार न्यायालयात प्रकरण स्पष्ट झाले. व सिरॅमिक प्रॉडक्ट लिमिटेडनेआमच्यानिवास्थानासाठी भूखंड देण्याची सहमती दर्शवली. त्यानुसार त्यांनी आम्हाला आर.एस.सी.एन.93,/ए पैकी सहा एकर वीस गुंठे जमीन 138 भूखंड मंजूर केले. त्यानंतर नगरपंचायतीने ठराव मंजूर केला आणि टॅक्स भरून घेण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या टी.पी.सी. क्रमांक 1672/48-सी.1 ते 138 अंतर्गत नगरपंचायत अर्ज जारी केले.
सन 1999 ते आजतागायत आम्ही नगरपंचायतीला टॅक्स भरत आहे.
आम्ही सर्वांनी 25 वर्षाहून अधिक काळ नियमितपणे टॅक्स भरण्यास सुरुवात केली. पुढे आम्ही ओ. एस. एन 366 /2023 ते 404/2023 खटला दाखल केला यामध्ये न्यायालयाने शांतता पूर्व ताबा व उपभोग डोंबारी समाजाविरुद्ध मनाई आदेश मंजूर केला आहे. आणि पोलिस संरक्षण देखील दिले आहे . असे असताना 2019 मध्ये घरे बांधण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी संपर्क साधला परंतु परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर कर्नाटक जमीन महसूल कायद्याच्या त्रुटीनुसार परवानगी देण्यात आली आहे.
पुढे 23मार्च2023 रोजी त्यावर विचार करण्यासाठी नगरपंचायतीला एक विनंती पत्र दिले. मात्र डोंबारी समाजाचा बेकायदेशीर असलेला ठराव क्रमांक 82 मंजूर केला. काही क्षेत्राचा नकाशा तसेच उच्च अधिकाऱ्यांनी मंजूर केलेला ठराव प्रमाणपत्र सादर केले. व आमच्या विरोध अडथळा आणि बेकायदेशीरपणाचा आरोप केला.
गेली पंचवीस वर्षे हुन अधिक काळ नगरपंचायत नियमितपणे टॅक्स भरून घेत आहे. तसेच खानापूर दिवाणी न्यायालयात दावा चालू असून नगरपंचायतीने चुकीचा ठराव मंजूर केला. व आमच्यावर अन्याय केला. म्हणून आमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी 82 नंबर ठराव रद्द करावा. मालमत्तेचे संरक्षण करावे . अशा आशयाचे निवेदन उपतहसीलदार एस के तंगोळी यांना देण्यात आले.
यावेळी उपतहशीलदार एस. के. तंगोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे पाठवतो असे आश्वासन दिले.
त्यानंतर नगरपंचायतीचे अभियंते श्री तिरुपती यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना जय जवान जय किसान तसेच रयत संघटनेचे अध्यक्ष बसनगौडा पाटील व पदाधिकारी व माऊली नगर सिरॅमिक कामगार विकास संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष यल्लारी गावडे, उपाध्यक्ष श्रीकांत गावडे सेक्रेटरी संदीप पाटील सदस्य देवाप्पा बाळेकुंद्री पिराजी कदम पुंडलिक मोटर मल्लाप्पा हलगेकर यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
