#तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पंतप्रधान सडक योजनेतून गेल्या दहा वर्षांपूर्वी कांजळे हरसनवाडी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. हरसनवाडी ब्रीज जवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बस वाहतूक तसंच इतर वाहतूक टप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. यासाठी खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य कमिटीचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व अँड सोनापा नांद्रनकर यांनी आमदार विठ्ठल हलगेकर त्यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती.
त्यांच्या मागणीनुसार पंतप्रधान सडक योजनेतून 10लाख 50 हजार रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
नुकताच या रस्त्याचा टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अशी माहिती खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी बोलताना दिली.
या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. या कामाला रामगुवाडी पंचायत सदस्य कमिटी व पीडीओ यांचे सहकार लाभले आहे.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की,कांजळे हरसनवाडी रस्त्यासाठी संबंधित ऑफिस ते न्यायालयीन लढा दिला आहे. त्या काळात अधिकाऱ्यांनी आमचे अतोनात हाल केले. तरी आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. सध्या रस्त्याला 10लाख50 हजार रुपये निधी मंजूर झाला.
