#भात पिकाचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील देगाव, मेंढील, पाली, जामगाव, कोंगळा हा परिसर भीमगड अभयारण्यात येत असल्याने या भागात हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
नुकताच हातातोंडाशी आलेली भात पिके कापणीच्या सराईवरती आली आहेत.
याच वेळी देगाव, मेंढी,पाली, जामगाव, कोंगळा आदी भागात पाच हत्तींनी भात शिवारात घुसून भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी वर्षभर काबाड कष्ट करून सोन्यासारखे पिकवलेले भात पिक कापण्यासाठी आलेल्या आहे.
याचवेळी पाच हत्तीने भात पिकात घुसून नुकसान करत आहेत.
तरी वन अधिकाऱ्यांनी याची दाखल घेऊन पाचही हत्तींचा बंदोबस्त करावा. तसेच लोकप्रतिनिधींनी वन अधिकाऱ्यांना सूचना करून हत्तीकडून होणारे भात पिकाचे नुकसान टाळावे.
असे मत भाजप कार्यकर्ते आनंद गावडे यांनी व्यक्त केलेले आहे.
तसेच नुकसान केलेल्या भात पिकाची पाणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून द्यावी. अशी मागणी या भागातील शेतकऱ्याकडून होत आहे.
