मालती मारुतीराव येळ्ळूरकर यांचे निधन
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील रहिवासी श्रीमती मालती मारुतीराव येळ्ळूरकर ( वय.९४) यांचे मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली व दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी आज दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.
खानापूर भाजप नेते किरण येळूरकर यांच्या त्या काकू होत.