“खानापूर जांबोटी रस्त्याची दुरावस्था”
ऊस वाहतूक वाहना धोक्याचा इशारा!
खानापूर प्रतिनिधी
नेहमीच चर्चेत असलेला खानापूर जांबोटी रस्ताकडे गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐन सुगीच्या हंगामात तसेच ऊस वाहतुकीच्या वेळीच रस्त्याची दैयनिय अवस्था झाली आहे.
खानापूर जांबोटी रस्ता जागोजागी मोठ्या प्रमाण उखडला आहे. तर काही ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून ही जात असताना अनेक अपघात घडले आहे. त्यामुळे त्या रस्त्याची त्वरित दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे.
यासाठी संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधी वेळ काळूपणा न करता लवकरात लवकर कामाचीसुरुवात करावी. अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
खानापूर जांबोटी रस्त्यावरून ऊस वाहतुकीसाठी गर्दी!
जांबोटी भागातून उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे केले जाते. त्यामुळे या भागातील या भागातील ऊस महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची मोठी गर्दी होते. त्यातच खराब रस्त्यामुळे ऊस वाहतूक वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत आहे.
# खानापूर जांबोटी रस्त्याची त्वरित दखल घ्या!
विनायक मतगेकर
खानापूर जांबोटी महामार्गाच्या रस्त्याची कोणीच दखल घेत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दाखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा खानापूर जांबोटी रोडवर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य युनियन संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी दिला आहे.
