माचीगड गावात पहाटेच्यावेळीअस्वलचा वावर”
गावात भीतीचे वातावरण!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा त्रास, हल्ले जंगला जवळील गावांना सातत्याने होत असतात.
कधी हत्ती कडून पिकाचे होणारे नुकसान , तर कधी गव्याकडून होणारे नुकसान तसेच माणसावर होणाऱ्या हल्ले त्याचबरोबर अस्वलाकडून मनुष्यावर होणारे हल्ले त्यामुळे जनता हिंस्र प्राण्यांपासून वैतागली आहे.
नुकताच माचिगड ( ता.खानापूर ) गावात सोमवारी पहाटेच्या वेळी अस्वलाचा वावर झालेला ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे झाला आहे.
त्यामुळे गावात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घडलेली घटना आशी की, सोमवारी पहाटेच्या वेळी काही नागरिक घरातून बाहेर पडले असता ,गल्लीतून अस्वल पळत जाताना दृष्टीस पडले. अचानक डोळ्यासमोर अस्वल आल्याने घाबराट पसरली. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
सकाळी ग्रामपंचायतीचे कार्यालय उघडले असता, नागरिकांना ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरात अस्वल ग्रामपंचायत समोरून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकीकडे हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. असे असताना माचिगड गावात पहाटेच्या वेळी अस्वल गल्लीतून जाताना पाहिल्याने जंगली प्राण्याकडून नागरिकांना धोका पत्करावा लागत आहे.
तेव्हा वन खात्याने वन व लोकप्रतिनिधी जंगली प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती कारवाई करावी. शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना संरक्षण द्यावे. अशी मागणी जनतेतून होत आहे.
