संदेश क्रांती न्यूज,:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री चौराशी देवी सौहार्द सोसायटीचे संचालक सातेरी शिवाजी कोलकार यांची नुकताच खानापूर तालुका आंबेडकर ब्रिगेड संघटनेच्या तालुका प्रधान कार्यदर्शीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा सोसायटीच्या. सभागृहात रविवारी दि.9 रोजी पार पडला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चौरशी देवी मल्टीपर्पज को.आप. सोसायटीचे चेअरमन व खानापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी.ई.नाडगौडा उपस्थित होते.
व्यासपीठावर संचालक डी. जी. पाटील, श्री. शिवगेकर, सेक्रेटरी श्री.काकतेकर, विश्वास देसाई, विनोद कदम, श्री पाखरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी श्री. काकतेकर यांनी केले.
यावेळी संचालक सातेरी कोलकार यांची तालुका संघटनेच्या तालुका प्रधान कार्यदर्शीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल,पुष्पहार, घालून सोसायटीच्या वतीने चेअरमन डॉ. डी.ई. नाडगौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन डॉक्टर नाडगौडा यांनी संचालक सातेरी कोलकार यांच्या बद्दल गौरव उदगार काढले.
आभार सेक्रेटरी श्री. काकतेकर यांनी मानले.
