# विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान विषयी जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. या उद्देशाने गोवा सायन्स सेंटर आणि गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्धमाने शनिवारी दिनांक. 8 रोजी खानापूर येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या पटांगणात सायन्स ऑन व्हील या विज्ञान प्रदेशांचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी विज्ञान प्रदर्शन बसचे उद्घाटन स्वामी विवेकानंदा स्कूलचे चेअरमन अँड चेतन मनेरिकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईल विज्ञान प्रयोग शाळेत विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल , तंत्रज्ञानाच्या नवकल्पना, त्याचबरोबर पर्यावरण अवकाश भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राशी संबंधित माहिती देण्यात आली.
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना चेअरमन अँड. चेतन मनेरिकर म्हणाले की, खेड्यापाड्या तुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स ऑन व्हील हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हे एक चांगले अभिनव पाऊल आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. असे आव्हान केले.
यावेळी कार्यक्रमला कॉलेजचे प्राचार्य पी.के.चापगावकर, प्राध्यापक शशिकांत पाटील, दिलीप शहापूरकर ,सदानंद कपिलेश्वरी, त्याचबरोबर गोवा सायन्स सेंटरचे भूषण राऊत गुलबर्गा ,सायन्स सेंटरचे अंबराया बेलमगी व लक्ष्मीकांत जमादार उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शन ला खानापूर शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोग प्रत्यक्षात अनुभवण्याचा आनंद शनिवारी दिवसभर मिळाला.
आव्हान!
सोमवार दिनांक 10 रोजी स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या आवारात दिवसभर विज्ञान प्रदर्शनाचा लाभ मिळणार आहे तेव्हा खानापूर परिसरातील शाळा , माध्यमिक विद्यालय ,कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा . असे आवाहन करण्यात आले आहे.
