“खानापूर शहरातील मेदरगल्ली लक्ष्मी मंदिरात चोरी”
#लक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील साडेचार लाख रुपये किमतीचा चांदी सोन्याचा ऐवज लंपास! शहरात भीतीचे वातावरण!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील गजबजलेल्या लोक वस्तीच्या मेदर गल्लीतील लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी दि.४ रोजी सकाळी उघडकीस आला. यावेळी लक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील चांदी सोन्याचे साडेचार लाख रुपये किमतीच्याच दागिण्याचा ऐवज
लंपास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
यावेळी घटनास्थळावरून माहिती अशी की खानापूर शहरातील मेदर गल्लीतील लक्ष्मी मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरा समोरील दरवाजाची कडी तोडून चोरट्याने प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीवरील तसेच मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली.
मंगळवारी सकाळी मंदिराचे दरवाजे
उघडताना चोरी झाल्याचे दिसून आले.
या घटनेत चोरट्याने सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने असा एकूण साडेचार लाखाचा ऐवज लंपास केला.
यामध्ये देवीच्या गळ्यातील चेन, कमरपट्टा, पादुका, तोडे, किरीट ,तांब्या ताट तसेच इतर पूजेच्या साहित्याचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच खाना पोलिसांनी घटना स्थळी दहावी घेतली व प्राथमिक पाहणी केली त्यानंतर पोलिसाकडून ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे चोरीचा शोध लावण्यास मदत होईल.
यावेळी मेदर गल्लीतील लक्ष्मी मंदिरच्या कमिटीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर शहरातील लक्ष्मी मंदिरात झालेल्या चोरी बद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरीचा तपास लावावा. अशी मागणी खानापूर नागरिकांतून होत आहे.
ढ
