#50 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कराटे बेल्ट कार्यक्रम संपन्न झाला.
गेल्या तीन वर्षापासून समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण घेतले जाते. या शाळेचे अनेक विद्यार्थी कराटे बेल्ट प्रशिक्षणात सहभागी होतात. कराटे बेल्ट प्रशिक्षण मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कराटे बेल्ट परीक्षेत भाग घेता येते.
शुक्रवारी शुक्रवारी कराटे बेल्ट परीक्षा पार पडली कराटे बेल्ट परीक्षा पार पडली. या कराटे बेल्ट परीक्षेत वेगवेगळ्या कलरचे बेल्ट बहाल करण्यात आले. यामध्ये व्हाईट बेल्ट, येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्ल्यू बेल्ट अशाप्रकारे जवळपास 50 हून अधिक कराटे पट्टू ना बेल्ट वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर डी नाडगौडा उपस्थित होते. यावेळी बेळगाव जिल्ह्या कराटे प्रेसिडेंट गजेंद्र काकतीकर, श्री सेनसाय, हरीश सोनार, स्कूलचे एडमिन सौ दिव्या नाडगौडा व मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर उपस्थित होते.
समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कराटे कोच गजेंद्र काकतीकर यांच्या अथक प्रयत्नाने शाळेचे विद्यार्थी कराटे प्रशिक्षण मध्ये आत्मविश्वासाने प्रशिक्षण घेतले. विजय संपादन केले. त्याबद्दल सचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. नाडगौडा यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी सिमस मुल्ला यांनी केले. तर आभार आदिती नाडगौडा यांनी मानले.

