#मुख्यमंत्र्याची घेणार भेट!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
वारकरी आणि कीर्तनकार हे नेहमीच व्यसनमुक्ती तसेच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोक जागरण करून समाजात भक्ती, एकोपा तसेच बंधू भाऊ व शांती पसरवण्याचे काम वारकरी संप्रदाय करत आहेत.
या वारकरी व कीर्तनकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारने प्रवचनकार व कीर्तन कार यांना दहा हजार तर वारकऱ्यांना 2000 रुपये मानधन द्यावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करणार असल्याची माहिती खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी ते बोलताना म्हणाले अलीकडे वारकरी संप्रदाय गावोगावी वाढला आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक तरुण केवळ वारकरी संप्रदायामुळे चांगल्या मार्गावर आले आहेत. सामाजहिताच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यामध्ये महिला वारकरी यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तालुक्यातील वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार या मंडळींना प्रोत्साहन मिळावे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मानधनाची मागणी करणार आहे.
असे माझे प्रयत्न आहेत. असे सांगितले. त्यांच्यासोबत खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियन संघाचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व राजेश पाटील उपस्थित होते.


